🕒 1 min read
मुंबई : ठाण्यातील महेंद्र भवने या व्यक्तीने पंतप्रधान मोदी(PM Narendra Modi) यांच्या मातोश्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इरानी(Smruti Irani) यांच्याबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टनंतर भाजपच्या महिला आघाडीने महेंद्र भवने(Mahendra Bhavane) याच्यावर शाईफेक करत त्याला चोप दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी भाजप महिला आघाडीचे कौतुक करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विकृतांना भाजपच्या महिलांनी चांगलाच धडा शिकवलाय. विकृत पोस्ट करणारी विषवल्ली मुळासकट छाटून टाकायला हवी. ही कारवाई महाविकास आघाडी सरकारने करायला हवी होती पण जे सरकारला जमलं नाही ते आमच्या भाजप महिला मोर्चाच्या ठाणे शहर अध्यक्षा मृणाल पेंडसे(Mrunal Pendse) व टीम ने करून दाखवले’, असे वाघ म्हणाल्या आहेत.
.#PM @narendramodi यांच्या आईबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणा-या विकृतांना भाजपच्या महिलांनी चांगलाच धडा शिकवलाय..
विकृत पोस्ट करणारी विषवल्ली मुळासकट छाटून टाकायला हवी..#MVA सरकारनं कारवाई करायला हवी होती पण जे सरकारला जमलं नाही ते आमच्या @PendseMrunal व टीम ने‘करून दाखवलं’शाबास !
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 11, 2022
दरम्यान,याविषयी भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी देखील ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विकृताला धडा शिकवल्याबद्दल ठाण्याच्या नगरसेविका आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे आणि त्यांच्या सहकारी महिलांचे अभिनंदन.’
महत्त्वाच्या बातम्या
- मायावती विधानसभा निवडणूक लढणार नाहीत; बसपा खासदार सतीशचंद्र मिश्रा यांची माहिती
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- रत्नाकर गुट्टेंना ईडीचा पुन्हा एकदा झटका; बीड जिल्ह्यातील पोल्ट्री केली जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
