मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत भाष्य करताना म्हणाले होते, ‘शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा आझाद मैदानावर जाऊन संप मिटवा’, त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पडळकरांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही’, असे भुजबळ म्हणाले आहेत.
छगन भुजबळ नाशिकमध्ये बोलताना म्हणाले, पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही. ज्यांच्या मताला आणि अनुभवला किंमत आहे, असे फक्त शरद पवार आहेत. प्रश्न सुटत नसतील, तर महाविकास आघाडीची प्रश्न सोडवण्याची सामूहिक जवाबदारी आहे. पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांना लोकांच्या संबंधात काळजी वाटण स्वाभाविक आहे. गिरणी कामगारांचा संप अजून संपला, असं कोणी जाहीर केलेले नाही. त्यामुळे मिलमधील लोक देशोधडीला लागले. एसटी संपाबाबत एवढा अट्टाहास करणं योग्य नाही. कामगारांना समजावून सांगणे हे पवार साहेबांचे काम असल्याचेही छगन भुजबळ पडळकरांना उद्देशून म्हणाले.
गोपीचंद पडळकर म्हणाले होते, शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा आझाद मैदानावर जाऊन संप मिटवा. अनिल परब यांनी स्वत: एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल, असे ठामपणे आश्वासित करावं, जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा,चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर;म्हणाले,’अमानुष मारहाण करण्यामुळे…’
- “…ते उत्तर प्रदेशात होऊ शकते, जर आठवलेंनी मध्यस्ती केली तर”, ‘त्या’ वक्तव्यावर रुपाली पाटील ठोंबरेंची प्रतिक्रिया
- “राजनाथ सिंहजी कोरोनातून लवकर बरे व्हा”, मुनगंटीवारांनी केली प्रार्थना
- “भाजपने मन मोठं करुन शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रिपद ध्यावं” ,रामदास आठवलेंचा सल्ला
- “राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचंय”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
