Share

“नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री फरार पण, उपमुख्यमंत्री कुठे?”,पवारांच्या बैठकीवरून भातखळकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल(१० जानेवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सह्याद्री अतिथी गृहावर एसटी संपबाबत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. दरम्यान, या बैठकीनंतर आता पुन्हा एकदा भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री ठाकरे फरार, पण उपमुख्यमंत्री कुठे आहेत?, असा खोचक सवालही भातखळकरांनी केला आहे.

यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फरार आहेत. पण उपमुख्यमंत्री कुठे आहेत? कोणत्या अधिकाराने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कामगारांच्या संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक बोलावली होती? त्याला काही घटनात्मक अधिकार आहे का? की एसटी कामगारांसाठी ही आणखी एक डोळ्यांची पालवी आहे?’, असे भातखळकर म्हणाले आहे.

दरम्यान, काल शरद पवार यांच्या उपस्थितीत २२ कर्मचारी संघटनांसोबत ही बैठक झाली असून या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपबाबत तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा झाली. तसेच यावेळी महाराष्ट्रातील प्रवासी वर्ग अत्यंत महत्वाचा आहे. मात्र एसटी संपामुळे मागील दोन महिन्यांपासून प्रवाश्यांचे हाल झाले आहेत. एसटी संपावर तोडगा काढण्याचा सरकारने सर्वोत्तपरी प्रयत्न केला. त्यामुळे कामावर परत या, एसटी पूर्वपदावर आणा. सर्व मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!