🕒 1 min read
औरंगाबाद: औरंगाबाद विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. विशेषतः यंदाच्या निवडणुकीत एकता पॅनलच्या सर्व १३ जागांवर दणदणीत विजय झाला. त्यापैकी दोन जागांवर महिला सभासद बिनविरोध निवडून आल्या आहेत.
दिनकर भारसाकळे, कृष्णाजी शिंदे, प्रशांत वाडे, राजेंद्र पेटकर, संदीप काकडे, मधुकर देगावे, राहुल साळवे, दिलीप बागुल, बाळू कोकणे, राजशेखर कुलकर्णी, सिद्धार्थ सोनावणे, नीता दांदले, सय्यद शबाना यांचा विजय झाला. निवडणूकी आधी पतसंस्थेकडून दिलेली वचनपूर्ती करण्यात आली होती. यात कर्ज मर्यादा ५ लाखावरून १४ लाख, कल्याण निधी ४ लाखांवरून ७ लाखांवर केला. संचालक मंडळाच्या मिटींग भत्यापोटी होणारा खर्च साडेतीन लाखांचा खर्च वाचवला, कार्यकाळात सभासदांची वैद्यकिय तपासणी करून घेतली. व्यवहारात पारदर्शकता आणली, सभासदांना संगणकीकृत पासबुक उपलब्ध करून दिले.
तात्काळ कर्ज सुविधा राबवल्या. कर्ज व्याज दर ११ % वरून ९ % केले. भांडवलावर संस्था उभी केली. कोरोना काळात मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कर्ज नूतनीकरण करतांना नियमाप्रमाणे ५ % शेअर्स कपात करण्यात येतात, दरवर्षी सभासदांना गृह उपयोगी भेट वस्तूचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात संस्थेचा आर्थिक व्यवहार RTGS द्वारे चालू ठेवला.
यंदाच्या वचनननाम्यात कर्ज मर्यादा वाढविणे, तातडीने कर्ज मर्यादा रु. करणे, कल्याण निधी मध्ये सुधारणा करणे, संस्थेची वेबसाईट सुरू करणे, NEFT, RTGS द्वारे कर्ज सभासदांच्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करणे, भविष्यात पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती अधिक भक्कम झाल्यास ५ टक्के शेअर्स कपात न करण्याचा निर्णय घेण्यात येईल, सभासदांच्या पूर्ण कर्ज रकमेचा विमा काढणे, व्यवहारात पारदर्शकता आणणे, संस्थेचे विश्वस्त व रखवालदार म्हणून काम करणे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती करणे, भविष्यात पतसंस्थेच्या मालकीची कार्यालयीन इमारत तयार करण्यात येईल, खर्चात काटकसर करणे, संचालक मंडळ यापुढेही मानधन घेणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसांची तत्परता! ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवले; पाहा व्हिडिओ
- महेश शिंदेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर;म्हणाले…
- “महापौर मॅडम तुमचं सरकार… तुमचा पेपर नेहमीच फुटलेला असतो”, सदाभाऊंची घणाघाती टीका
- हृतिक पुन्हा लग्न करणार? सुझानला घटस्फोट दिल्यानंतर वडील राकेश रोशन यांचा खुलासा
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची आज उच्चस्तरीय बैठक; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांच्या मंत्र्यांची राहणार उपस्थिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
