Share

“महापौर मॅडम तुमचं सरकार… तुमचा पेपर नेहमीच फुटलेला असतो”, सदाभाऊंची घणाघाती टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यात कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यावरुन चांगलाच कलगीतूरा रंगला आहे. ‘राज्यातील शाळा बंद आणि बार सुरु, महाविकास आघाडीला क्लास पेक्षा ग्लास महत्वाचा’, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी सदाभाऊंवर निशाणा साधत ‘सदाभाऊ यांच्या बुद्धीची किव येते’. अशी टीका केली होती. त्यावर सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणतात, ‘महापौर मॅडम तुमच हे सरकार खूप शिकलेलं आहे. तुमचा पेपर नेहमीच फुटलेला असतो आणि बिल्डरांना कर माफी देऊन, विदेश दारूवरचा कर १५० % कमी करून प्रगतिशील महाराष्ट्राला हेवा वाटावा असं राजकीय यश आपण संपादन केलं आहे.’ अशी टीका सदाभाऊ खोत यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना पेडणेकर म्हणाल्या की,’सदाभाऊ खोत आणि माझी फारशी ओळख नाही. बार आणि शाळा यांचे साम्य दाखवणे ते अत्यंत मूर्खपणाचे लक्षण आहे. इतर राज्यांमध्ये जी नियमावली आहे, तीच महाराष्ट्रात असून Who च्या गाईडलाईननुसार एसोपी ठरतो. परत जुन्या कढीला उत आला आहे’, असे पेडणेकर म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!