Share

गोवा भाजप पर्रीकरांचा वारसा पुढे नेताना दिसत नाही म्हणत ‘या’ मंत्र्याने ठोकला भाजपला रामराम

Published On: 

गोवा: प्रमोद  सावंत यांच्या सरकारला गोव्यात मोठा धक्का बसला आहे. आमदार तथा मंत्री मायकेल लोबो (Michael Lobo) यांनी भाजप पक्षातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

“मी गोवा मंत्रिमंडळ आणि आमदार या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. गोवा भाजपमध्ये मला मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेताना दिसत नाही, ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांना भाजपने बाजूला केले आहे.” अशी प्रतिक्रिया मायकेल लोबो यांनी दिली आहे.

“मी गोव्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. कळंगुट मतदारसंघातील लोक माझ्या निर्णयाचा आदर करतील अशी आशा आहे. मी आमदारकीचा राजीनामा देईन, पुढे काय पाऊल टाकायचे ते बघू. मी इतर राजकीय पक्षांशी चर्चा करत आहे. आमच्याकडे ज्या पद्धतीने पाहिले जाते त्यामुळे मी नाराज होतो आणि पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत.”  असेही त्यांनी पक्ष सोडताना म्हटले आहे. त्यामुळे हा भाजप पक्षाला मोठा धक्का समजला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!