Share

यंदाचा IPL सीजन महाराष्ट्रात घेण्यासाठी शरद पवार आग्रही, …BCCI चा B प्लानही तयार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : यंदाचा आयपीएल संपूर्ण सीजन महाराष्ट्रात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आग्रही आहेत. तर कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर BCCI वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करत आहे. बीसीसीआयने प्लान B तयार ठेवला आहे. या प्लाननुसार IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात आयोजित केला जाऊ शकतो. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, त्याच्या जवळील ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील आणि पुणे गहुजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियम या चार मैदानांवर संपूर्ण IPL चा सीजन खेळवण्याचा BCCI चा विचार आहे.

या संदर्भात पाच जानेवारीला बीसीसीआयचे अंतरीम CEO व आयपीएलचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर हेमांग अमीन यांनी मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांची भेट घेतली होती. काही दिवसांनी अमीन आणि पाटील यांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बीसीसीआयच्या प्रस्तावाला शरद पवारांनी हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती आहे. या आठवड्यात किंवा पुढच्या दहा दिवसात बीसीसीआय आणि एमसीएचे अधिकारी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आवश्यक परवानग्या मिळवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल.

शनिवारी महाराष्ट्रात ४०,९२५ तर मुंबईत २०,९७१ कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी महाराष्ट्र सरकारने नव्या निर्बंधाबाबत आदेश जारी करताना काही नियमांचे कठोर पालन होणार असेल, तर क्रीडा स्पर्धांना परवानगी दिली आहे.

यंदाच्या आयपीएल हंगामासाठी अजून मेगा ऑक्शन पार पडायचं आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा देशातच आयोजित करण्याचा बीसीसीआय गांभीर्याने विचार करतेय. बीसीसीआयने सध्याची कोविड स्थिती लक्षात घेऊन रणजी करंडकासह काही महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. सध्या बीसीसीआयकडे महाराष्ट्राचा पर्याय आहे, पण इथे सुद्धा स्पर्धा आयोजित करणं शक्य झालं नाही, तर मग स्पर्धा परदेशात खेळवली जाईल, असे सूत्राने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!