🕒 1 min read
मुंबई: जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी संपबाबत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक होणार आहे. मात्र या बैठकीवरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी पवारांवर निशाना साधला आहे.
‘शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत एसटी संपाबाबत मह्त्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी १२.३० वाजता बैठक होणार आहे. मात्र शरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे ज्यामुळे ते एसटी संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेणार आहेत? मुख्यमंत्री काय करतायत?’ असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत एसटी संपाबाबत मह्त्त्वाची बैठकसह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी १२.३० वाजता बैठक होणार आहे.
शरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे ज्यामुळे ते एसटी संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेणार आहेत? मुख्यमंत्री काय करतायत? pic.twitter.com/wfvyjwGEyK— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 10, 2022
दरम्यान वारंवार आवाहन करूनही संपावरील कर्मचारी कामावर परत येत नसल्याने आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खासगी चालकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून रविवारी नागपूर विभागात ६ चालकांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे संप सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपूर, अमरावती येथे फेऱ्या पाठविण्यात आल्या आहेत. तर अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना नोटीशी पाठवण्यात येत आहेत. दरम्यान आज होणाऱ्या बैठकीत यावर काही ठोस पर्याय निघण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘विरोधकांनी नियमावली पाळायची आणि सत्ताधाऱ्यांनी ती धुडकावली तरी…’, राऊतांचा हल्लाबोल
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
- ‘…तर घटनात्मक तरतुदींनुसार करायच्या इतर अनेक गोष्टी का डावलल्या जातात?’
- “नाथाभाऊंचे डोके फिरले असून ईश्वर त्यांना सदबुध्दी देवोत”, ‘त्या’ वक्तव्यावरून महाजनांची प्रतिक्रिया
- पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अजित पवार कोणाला संधी देणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
