Share

“नाथाभाऊंचे डोके फिरले असून ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवोत”, ‘त्या’ वक्तव्यावरून महाजनांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

जळगाव: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse) आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. एकनाथ खडसे यांना कोरोना झाला असता, गिरीश महाजन यांनी ईडी अटक करणार या भीतीनेच खडसे यांना कोरोना झाल्याची टीका केली होती. मात्र  यानंतर गिरीश महाजन यांनाही कोरोनाने गाठले असताना एकनाथ खडसे यांनीही चांगलीच प्रतिक्रिया दिली.

पोलिसांच्या भीतीने महाजन यांना कोरोना झाला असावा, असे खडसे यांनी म्हंटले. असे आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच यांच्यात परत वाकयुद्ध सुरु झाले आहे.  कोरोनाचा मुद्दा राजकीय चर्चेचा विषय बनून गेला आहे. पोलिसांच्या अटक या वक्तव्यानंतर महाजन यांनी खडसे यांना ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये दाखवावे, अशी टीका केली. त्यावर खडसे यांनी ”गिरीशभाऊ यांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे,” असा टोला लगावला. आता यावरच गिरीश महाजन यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

”एकनाथराव खडसे यांनी कोरोनावरून आज दिलेली प्रतिक्रिया ही त्यांच्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी आहे. मात्र मी त्या बद्दल बोलणार नाही, ते माझे संस्कार नाहीत. मात्र नाथाभाऊंचे आता डोके फिरले असून त्यांना ईश्‍वर सदबुध्दी देवोत.” अशी खोचक प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.

तसेच “एकनाथराव खडसे यांनी विकृतीचा कळस गाठून अतिशय खालच्या स्तरावरून कॉमेंट केली आहे. खरं तर नाथाभाऊ यांचा स्वभाव आणि आजवरचा लौकीक पाहता ही प्रतिक्रिया तशी आश्‍चर्यकारक नाही. मात्र ही प्रतिक्रिया त्यांचे मानसिक संतुलन ढळल्याचे सिध्द करणारी ठरली आहे. मला या संदर्भामध्ये काहीही बोलायचं नाही. आता कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याची त्यांना हौस आलेली आहे. मात्र हे त्यांचे फ्रस्टेशन आहे. सत्तेचा कोणता तरी तुकडा भेटेल म्हणून पक्षांतर केल्यानंतरही त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही” असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!