🕒 1 min read
नवी दिल्ली: देशावर कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असतानाच आता ५ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरच निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत महत्वाची १० मुद्दे आहेत.
महत्वाचे १० मुद्दे-
१) यात पहिला मुद्दा म्हणजे सर्व राज्यांच्या निवडणुका ७ टप्प्यात होणार आहेत. १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर राज्यात एकूण ६९० मतदारंघात निवडणूक होणार आहेत. त्यासाठी १६२० मतदान केंद्र उभारणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (Election Commissioner Sushil Chandra) यांनी दिली आहे. या पाचही राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.
२) तर कोरोना प्रार्दुभाव आणि नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझरची सोय करण्यात येणार आहे.
३) कोरोनामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्यात येणार आहेत. तसेच निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे लसीकरण झालेले असणे बंधनकारक असणार आहे.
४) तर पहिल्यांदाच रॅली, पदयात्रा, रोडशो, बाईक रॅली यांना १५ जानेवारीपर्यंत बंदी असणार आहे.
५) तर यावर्षी २४..९ लाख तरुण पहिल्यांदा मतदान करणार आहेत. तर ११.४ लाख महिला पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
६) निवडणुकीसाठी ५ ही राज्यांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तर उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरता येणार आहेत.
७) तर कोरोनामुळे ८० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि कोरोना रुग्णांना पोस्टल मतदान करता येणार आहे.
८) तसेच सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने अगोदरच पुरेशा प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची व्यवस्था करावी असे आदेश देण्यात आले आहेत.
९) आणि सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना तिकिट दिल्यास पक्षांना याची माहिती देणे आता बंधनकारक असणार आहे.
१०) यासाठी ऍपच्या माध्यमातून मतदारांना आपला उमेदवार आणि त्याची माहिती जाणून घेता येणार आहे.
ही यंदाच्या निवडणुकीतील महत्वाची मुद्दे आहेत. याबाबत निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; १० मार्चला लागणार निकाल
- भाजप आमदार राम कदमांना कोरोनाचा विसर
- ‘मोनलूपिरावीर या औषधाचा वापर टाळा, अन्यथा…’, डॉ. कपिल झिरपे यांचा इशारा
- ‘तेजस्वी प्रकाशचे वागणे आवडत नाही..’ म्हणणाऱ्या करण कुंद्राच्या बहिणीचे ट्वीट चर्चेत
- भाजप नेते गिरीश महाजन यांनाही कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
