🕒 1 min read
नवी दिल्ली: देशावर कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असतानाच आता ५ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
आयोगाने ठरलेल्या वेळापत्रकानुसारच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा(Election Commissioner Sushil Chandra) म्हणाले की, नियोजित वेळेत निवडणुका होणे हा नागरिकांचा हक्क आहे. त्यानुसार आम्ही निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटात काही नवीन नियम आणण्यात आले आहेत. सुरक्षित निवडणुका घेण्यावर आमचा भर आहे. पाच राज्यांत ६९० मतदारसंघात विधानसभा निवडणुका होणार आहेत. एका मतदान केंद्रावर आता दीड हजारऐवजी १ हजार २५० मतदार असतील. मतदान केंद्रे १६ टक्के वाढवण्यात आली आहे.
१० मार्चला लागणार निकाल-
तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना तिकिट दिल्यास पक्षांना याची माहिती देणे आता बंधनकारक असणार आहे.
याचबरोबर पक्षाच्या संकेतस्थळावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती आणि त्याचसोबत त्याला का उमेदवारी देण्यात आली, याची माहितीही देणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान उमेदवारांना १५ जानेवारी पर्यंत केवळ डिजिटल प्रचार करता येणार आहे. त्यामुळे रोड शो, पदयात्रा, बाईक रँली या प्रचारावर बंदी असणार आहे. रात्री ८ नंतर प्रचाराला बंदी असणार आहे. कोरोनामुळे मतदानाची वेळ एक तास वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीचा पहिला टप्पा १० फेब्रुवारीला दुसरा १४ तर तिसरा २० फेब्रुवारीला असणार आहे. तर गोव्यात १४ फेब्रुवारीला मतदान होईल तर १० मार्चला मतमोजणी होईल. पंजाब, गोवा आणि उत्तराखंड मध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होईल.
महत्वाच्या बातम्या:
- “महाराष्ट्राचे पोलीस सक्षम, कुठलाही हमला होऊ शकत नाहीत”, पटोलेंनी दिली ‘त्या’ घटनेवर प्रतिक्रिया
- भाजप आमदार राम कदमांना कोरोनाचा विसर
- लोकांमध्ये ओमायक्रॉन वेगाने का पसरत आहे?, WHO ने सांगितली ‘ही’ तीन कारणे
- ‘तेजस्वी प्रकाशचे वागणे आवडत नाही..’ म्हणणाऱ्या करण कुंद्राच्या बहिणीचे ट्वीट चर्चेत
- भाजप नेते गिरीश महाजन यांनाही कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
