Share

भाजप नेते गिरीश महाजन यांनाही कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

जळगाव: राज्यात कोरोनाची (Corona) तिसरी लाट सुरू झाली असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांसोबतच अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या कार्यालयातही कोरोनाने शिरकाव केला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावत अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. यात आणखी एका नेत्याचा समावेश झाला आहे. भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. गिरीश महाजन यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वत: ला घरीचं क्वारंटाईन करुन घेतलं आहे. ते घरीच उपचार करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये संपर्का त आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

शुक्रवारी गिरीश महाजन यांनी राज्यातील विविध प्रश्न, नागपूरमध्ये अतिरेक्यांनी केलेली रेकी आणि पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत घडलेल्या प्रकारावरुन काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. यावेळी खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) देखील उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन महाजन यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!