🕒 1 min read
रांची : झारखंडमधील धनबादमधून पुन्हा एकदा एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे भाजप कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला थुंकी चाटायला लावले. यावेळी जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या. पीडित मुस्लीम व्यक्तीचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना भाजप खासदार पीएन सिंह, भाजप आमदार राज सिन्हा आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत घडली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सीएम हेमंत सोरेन यांनी धनबादच्या डीसींना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले. शांततेत राहणाऱ्या झारखंडमधील लोकांच्या या राज्यात वैमनस्याला जागा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. भाजपचे खासदार पशुपतीनाथ सिंह आणि आमदार राज सिन्हा यांच्या उपस्थितीत भाजप नेते आणि कार्यकर्ते ‘पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी’ बद्दल शहराच्या मध्यभागी मूक धरणे आंदोलन करत होते. यावेळी मारहाण झालेल्या व्यक्तीने शिवीगाड केल्याचा आरोप आहे. तसेच त्याने पंतप्रधानांविरोधातही अपशब्द वापरले, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
.@dc_dhanbad कृपया उक्त मामले की जाँच कर दोषियों पर सख्त कार्यवाई करते हुए सूचित करें।
अमन चैन से रहने वाले झारखण्डवासियों के इस राज्य में वैमनस्य की कोई जगह नहीं है।@dhanbadpolice @JharkhandPolice https://t.co/XXZFcu9mNo— Hemant Soren (@HemantSorenJMM) January 7, 2022
पीडित व्यक्ती धनबादच्या वासेपूर येथील समशेर नगर येथील रहिवासी आहे. पीडित व्यक्तीचा भाऊ रेहान याने एफआयआर दाखल केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांच्या घरी कारवाई केली असून चौघांना अटक केली. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक मनोज स्वरगियरी यांनी सांगितले.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना, निषेधाच्या ठिकाणी उपस्थित असलेले धनबादमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार राज सिन्हा म्हणाले या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. आमदार राज सिन्हा म्हणाले, “हा (पीडित) माणूस आमच्यासमोर आला आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांना शिवीगाड करू लागला. आम्ही त्याला निघायला सांगितले. आम्ही बसलो होतो तिथून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली तेव्हा त्यांचे नेमके काय झाले हे मला माहीत नाही. मात्र, हे संपूर्ण प्रकरण कटकारस्थान होते का, याचा तपास होण्याची गरज आहे.”
महत्वाच्या बातम्या –
- “पंतप्रधान ओबीसी असतांना त्यांच्याकडून समाजाला अनेक आशा होत्या, परंतु…”
- नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी गंभीर बाब- देवेंद्र फडणवीस
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय त्याचं आम्ही अगोदरच..” ममता बॅनर्जीं मोदींवर कडाडल्या
- आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया;म्हणाले…
- पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी तुषार भोसलेंनी केला महामृत्यूंजय मंत्रजाप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
