🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांना फोन कॉलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याविरोधातच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना फडणवीस म्हणाले की,’ही अतिशय गंभीर बाब आहे. याची माहिती आता पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांना मिळालेली आहे. या संदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा घेतील आणि या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे.’ तसेच शेलार सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात. सरकारचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार ते सातत्याने बाहेर आणत आहेत. त्यामुळे कदाचित अशा प्रकारची धमकी आली असेल’, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणी शेलार आता गृहमंत्र्यांनाही पत्र लिहिणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी पोलीस आयुक्तांना दोन्ही नंबरची माहिती दिली असून याबाबत तपास करण्याची विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्यांमुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले”
- पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत
- …त्यामुळे कॅ.अमरिंदर यांचा बार फुसका आहे हे समोर आले- संजय राऊत
- “पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…”
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघणाऱ्या मुर्दाड सरकारचा तीव्र निषेध’, भातखळकरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
