🕒 1 min read
नवी दिल्ली: सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहे. या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय नेते सभा तसेच विविध ठिकाणी रॅली इत्यादींचे आयोजन करताना दिसत आहेत. त्याच सोबत आरोप-प्रत्यारोप देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरूच आहेत. एकंदरीतच काय तर सगळ्याच राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी चांगलीच कंबर कसली आहे.
पुढच्या काही महिन्यांमध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. येत्या एक दोन दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून या निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने तसेच वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी निवडणूक आयोगाला एक महत्वाचा सल्ला दिला आहे.
निवडणूक आयोगाला सल्ला देताना प्रशांत किशोर म्हणाले, ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमध्ये लसीकरण वाढवण्याची मागणी प्रशांत किशोर यांनी केली आहे. निवडणुका होणाऱ्या राज्यामंध्ये ८० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. कमीत कमी ८० टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले पाहिजेत असे प्रशांत किशोर म्हणाले आहेत. प्रशांत किशोर सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांच्यासाठी, सध्या रणनीतीकार म्हणून काम करत असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सुटलेल्या पोटामुळे सलमान झाला ट्रोल ; नेटकरी म्हणाले…
- अमृता फडणवीसांची विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस; म्हणाल्या,‘आता कोर्टात जाऊन साफ करावी…’
- ज्या देशात देवी म्हणून महिलांची पूजा केली जाते त्याच देशात मुस्लिम महिलांना…
- खुशखबर; मुंबई, पुणे, नागपूरनंतर आता औरंगाबादेतही धावणार मेट्रो..!
- मंत्र्यांच्या कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
