🕒 1 min read
औरंगाबाद: शहरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध विकास कामे होत आहेत. यामध्ये आता आणखी एका विकास कामाची भर पडणार आहे. मुंबई, पुणे, नागपूरनंतर आता औरंगाबाद शहरातही मेट्रो सुरू होऊ शकते. ऑरीक सिटी ते वाळूज एमआयडीसी भागांना मेट्रो रेल्वेने जोडण्याचा विचार मनपा आयुक्त अास्तिक कुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांनी केला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी पीएमसीची देखील नियुक्ती केली आहे. या प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी स्मार्ट सिटीकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
औरंगाबाद शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता येणाऱ्या काळात मेट्रोची आवश्यकता भासणार आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर झाला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात यामध्ये आणखी वाढ होण्यासाठी मेट्रोची साथ आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात वाळूज ते ऑरीक सिटी हा प्रकल्प यशस्वी झाल्यास शहरातील इतर भागातही मेट्रोचा विचार केला तरी असे झाल्यास शहरात कुठूनही कुठे पोहोचणे अगदीच सोपे होणार आहे.
मेट्रोच्या प्रस्तावाची फाईल लेखा विभागाकडून स्मार्ट सिटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मेट्रोचा खर्च हा औरंगाबाद महानगरपालिकेला परवडणार नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत हे काम केल्यास ते अधिक सोपे होईल यादृष्टीने प्रशासकांनी पीएमसीची नियुक्ती करण्यासाठी स्मार्ट सिटीकडे ही जबाबदारी सोपवली आहे. केंद्रीय पेट्रोलियम तथा नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी हे शहरात येणार आहेत. त्यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव पुरी यांच्यासमोर सादर करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- “शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका
- “शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका
- ‘मुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार?’, पेडणेकरांनी दिले उत्तर
- भाजपचा अजून एक दावा ठरला फोल? काँग्रेसने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले,’पंजाब माफ नाही करणार’
- “मुख्यमंत्री ठाकरे योग्य निर्णय घेतली आणि कोरोनाला धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
