🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया याला अटक करण्यात आली आहे. त्याने केलेल्या टिप्पणीवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेने भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे.
शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी तीव्र शब्दात भाजपवर टीका करत म्हणलं, भाजपने विद्यापीठ सुरू करावं. कसं ट्रोलिंग करावं एखाद्याला कसं आयुष्यातून उठवावं याचा कारखाना म्हणजे भाजप आहे. विकृत मनोवृत्तीची ही माणसं आहेत. सर्व ट्रोलला अद्दल घडली पाहिजे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी मनीषा कायंदे यांनी केली आहे. आता या सर्व टीकांवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पलटवार केला आहे.
आक्षेपार्ह भाषेचं समर्थन कुणीही करणार नाही पण हे उपमुख्यमंत्री भरसभेत बोलले शिवाय इतर नेते ही महिलांचा उपमर्द करणारी वक्तव्य करताहेत
शिवसेनामंत्री गुलाबराव पाटील ने खासदार महिलेवर भरसभेत वापरलेली भाषा आक्षेपार्ह नव्हती का..अजूनही गुलाबराव वर @MahaCyber1 ने कारवाई का केली नाही— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 6, 2022
भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत शिवसेनेवर जोरदार पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या, आक्षेपार्ह भाषेचं समर्थन कुणीही करणार नाही, पण हे उपमुख्यमंत्री भरसभेत बोलले शिवाय इतर नेतेही महिलांचा उपमर्द करणारी वक्तव्य करतात. शिवसेनामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी खासदार महिलेवर भरसभेत वापरलेली भाषा आक्षेपार्ह नव्हती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तसेच त्यांच्यावर अजून कारवाई का केली नाही असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- लग्नाच्या तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेता आमिर अली आणि संजीदा शेख यांचा घटस्फोट
- ‘एखाद्याला आयुष्यातून कसं उठवावं याचा कारखाना म्हणजे भाजप’; मनीषा कायंदे यांची भाजपवर जोरदार टिका
- रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त ट्विटचा निषेध करत विद्या चव्हाणांनी साधला अमृता फडणवीसांवर निशाणा
- रश्मी ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विटनंतर भाजपच्या जितेन गजारिया यांना नोटिस
- नाना पाटेकरांची मिमिक्रि करणाऱ्या कलाकाराचा आत्महत्येचा प्रयत्न ; जाणून घ्या प्रकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
