मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया याला अटक करण्यात आली आहे. त्याने केलेल्या टिप्पणीवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील आक्षेपार्ह ट्विट केले आहे. यावर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी तीव्र शब्दात भाजपवर टीका केली आहे.
या आक्षेपार्ह ट्विट प्रकरणानंतर पोलिसांनी जितेन गजारिया (Jiten Gajaria) यांना अटक केली आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी देखील तीव्र शब्दात या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपमध्ये कोण कसं आहे हे आम्हाला माहीत आहे, कोणत्याही नेत्याच्या पत्नीवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली होती.
शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी देखील या प्रकरणाचा तीव्र निषेध करत भाजपवर टीका केली आहे. भाजपने विद्यापीठ सुरू करावं. कसं ट्रोलिंग करावं एखाद्याला कसं आयुष्यातून उठवावं याचा कारखाना म्हणजे भाजप आहे. भाजपला काही काम नाही. त्यामुळे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. ही शिकलेली माणसं आहेत. भाजप यांना महिन्याला २५ हजार पगार देते असं आम्ही ऐकलंय. विकृत मनोवृत्तीची ही माणसं आहेत. सर्व ट्रोलला अद्दल घडली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त ट्विटचा निषेध करत विद्या चव्हाणांनी साधला अमृता फडणवीसांवर निशाणा
- रश्मी ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विटनंतर भाजपच्या जितेन गजारिया यांना नोटिस
- नाना पाटेकरांची मिमिक्रि करणाऱ्या कलाकाराचा आत्महत्येचा प्रयत्न ; जाणून घ्या प्रकरण
- चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली विधानपरिषद सदस्य पदाची शपथ; म्हणाले…
- ‘सुरक्षा त्रुटी’, मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; सांगितला पंजाबमधील घटनाक्रम

