मुंबई : अभिनेते नाना पाटेकरांची (Nana Patekar) नक्कल करण्यासाठी प्रसिद्ध असलेले कॉमेडियन अभिनेता तीर्थानंदने (Comedian Teerthanand) आत्महत्येचा प्रयत्न (attempted suicide) केला होता. तो छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ (Kapil’s show) मध्ये देखील काम केले होते. मात्र सुदैवाने तो आता सुखरुप आहे.
दरम्यान तीर्थानंद रावने (Comedian Tirthanand Rao) विष पिऊन आत्महत्य करण्याचा प्रयत्न केला. २७ डिसेंबरच्या संध्याकाळी ही घटना घडली होती. सुदैवाने त्याच्या शेजाऱ्यांना याविषयी वेळीच समजल्याने त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आणि तीर्थानंदचे प्राण वाचले. चार दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर तीर्थानंदला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तीर्थानंद हा हुबेहूब नाना पाटेकरांची नक्कल करायचा. ‘आधीच आर्थिक समस्या असताना कुटुंबीयांनीही माझी साथ सोडली. मी रुग्णालयात असतानाही आई किंवा भाऊ मला भेटायला आले नव्हते. आम्ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो.

माझे कुटुंबीय माझ्याशी बोलत नाहीत. माझ्यावर कर्जाचं ओझं आहे. जिच्यासोबत लग्न केलं, तिने दुसऱ्याशी लग्न केलं. माझ्या मुलीसोबतही माझा संपर्क नाही. माझ्या कामाने मला ओळख आणि पैसा दिला. मात्र आता पुन्हा मी हीरोवरून झीरो झालो आहे’, असे तीर्थानंद एका मुलाखतीत म्हणाला होता. जवळपास आठ विविध भाषांमध्ये त्याने काम केलयं. ”नाना पाटेकर यांचा सारखा दिसणारा म्हणून मला ओळखायचे. मी त्यांची नक्कल करायचो. मात्र करोना महामारी आणि लॉकडाउनमुळे माझी परिस्थिती खूप वाईट झाली आहे. जी काही कामं मिळत होती, त्याचेही पैसे रखडले आहेत.’’ असं ही सांगितले. तीर्थानंदने २०१६ मध्ये कपिल शर्माच्या (comedian Kapil Sharma)शोमध्ये काम केलं होतं.
महत्वाच्या बातम्या:
- ‘विषाचे कडू घोट प्राशन करून सिंधुताईंनी अनाथांच्या आयुष्यात हसू फुलवलं’
- ‘त्या’ घटनेवरून अमरिंदर सिंग यांनी केली पंजाब मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
- भाजप नेते राम सातपुते कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- ‘पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’, भातखळकरांची मागणी
- ‘दर्पण’ वृत्तपत्राच्या माध्यमातून जांभेकरांनी राष्ट्रभक्ती व समाजसेवेचे बीज महाराष्ट्रात रुजवले- चंद्रकांत पाटील

