Share

बॉलिवूड गायक सोनू निगमला कोरोनाची लागण; पत्नी, मुलगा देखील पॉझिटिव्ह

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत परत वाढ होताना दिसत आहे. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा फटका बसला असून आता गायक सोनू निगमला (singer Sonu Nigam)  कोरोनाची (Covid-19) लागण झाली आहे. तसेच पत्नी मधुरिमा निगम(Madhurima) आणि मुलगा निवान निगम (Nevan) देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. याबद्दल गायक सोनू यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

सध्या सोनू निगम दुबईमध्ये (Dubai)असून तिथेच त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आले आहे. सोनू निगमने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याची माहिती शेअर केली आहे. या व्हिडीओद्वारे त्याने तो कशाप्रकारे दुबईमध्ये कोरोनाशी लढा देत आहे, याबाबत माहिती दिली आहे. तसेच तो म्हणाला की, “तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी कोव्हिड पॉझिटिव्ह आहे. अनेकांना हे माहित आहे आणि अनेकांना नाही. मात्र मी कोविड पॉझिटिव्ह आहे असे मला वाटत नाही हे देखील तितकेच खरं आहे. मी दुबईत आहे.

https://www.instagram.com/tv/CYTznMkg1Ti/?utm_source=ig_web_copy_link

मला भारतात यायचे होते, कारण मला भुवनेश्वरमध्ये परफॉर्म करायचे होते आणि सुपर सिंगर सीझन ३ चे शूटिंगही करायचे होते. मात्र जेव्हा माझी कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा मी पॉझिटिव्ह आढळलो. पण मला आशा आहे की मी हळूहळू बरा होईन.” यापुढे त्याने सांगितले की, “आमच्या आजूबाजूला अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

हा विषाणू खूप वेगाने पसरत आहे. माझी पत्नी मधुरिमा निगम आणि मुलगा निवान देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. माझा मुलगा, माझी पत्नी आणि माझ्या पत्नीची बहीण या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही एक आनंदी कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब आहोत.” सोनू निगम गेल्या दीड महिन्यांपासून सतत कॉन्सर्ट आणि गाण्यांचे शूटिंग करत होता. त्यामुळे तो त्याच्या कुटुंबाला भेटलाही नाही. आता कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला दुबईतच त्याच्या कुटुंबासह क्वारंटाइन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!