🕒 1 min read
मुंबई: राज्यातील राजकीय वातावरण निवडणुकांच्या तोंडावर चांगलेच तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तर रोज आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्याच सोबत आता निवडणुका जवळ आल्या म्हणल्यावर सत्तेत टिकून राहण्याची धडपड देखील महाविकास आघाडी सरकारला करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करामधून सूट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे.
मुंबईतल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करामधून सूट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप पक्षाच्या नेत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली होती. तसेच त्यांनी आज पुन्हा आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. आशिष शेलार म्हणतात, आता निवडणूक जवळ येताच ५०० चौ.फु. घरांना मालमत्ता कर माफ! या घोषणेचा पाऊस काल मुंबईत पडला मग ठाणे, नवी मुंबईकडून हे ‘मतलबी वारे’ राज्यात पुढे सरकू लागलेत, अशा शब्दात शिवसेनेवर त्यांनी निशाणा साधला आहे.
आता निवडणूक जवळ येताच "500 चौ.फु. घरांना मालमत्ता कर माफ!" या घोषणेचा पाऊस काल मुंबईत पडला मग ठाणे, नवी मुंबईकडून हे "मतलबी वारे" राज्यात पुढे सरकू लागलेत.
लोक हो! तुम्ही जाणताच…
प्रिटींग मिस्टेकवाल्यांची संगत बरी न्हाय!
निवडणूक मुहूर्तावरच्या घोषणेची खात्री काय?
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 4, 2022
शिवसेने सोबतच आशिष शेलार यांनी कॉंग्रेसवर देखील टीका केली आहे. काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात घोषणा केल्या आणि सत्ता आल्यावर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगून वारंवार हात झटकले.. मग तो विषय झोपडपट्टी नियमित करायचा असो, मोफत वीज देण्याचा असो वा मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा असो…६० वर्षे घोषणा..फसवणूक आणि प्रिंटींग मिस्टेक..बस्स. असं म्हणत आशिष शेलार यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
- औरंगाबाद शहर होणार धूळमुक्त; मनपातर्फे २४ तास कार्यान्वित राहणार ‘ही’ यंत्रणा..!
- “रश्मी ठाकरे यांना प्रमुखपद दिले तर…”; अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन चर्चेला उधाण
- जळगाव महामार्ग चौपदरीकरण समस्यांबाबत अब्दुल सत्तारांनी घेतली नितीन गडकरींची ‘विशेष भेट’.!
- रोमँटिक सीनसाठी अभिषेक घेतो का ऐश्वर्याचा सल्ला?
- ‘सातारा पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार’, शिवेंद्रसिंहराजेंनी केले स्पष्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
