Share

अखिलेश यादव यांनी साधला योगींवर निशाणा; म्हणाले,‘भगवान श्रीकृष्ण रोज माझ्या स्वप्नात…’

Published On: 

🕒 1 min read

लखनऊ : सोमवारी(३ जाने.)माध्यमांशी संवाद साधत असतांना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव(Akhilekh Yadav) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलत असतांना यादव म्हणाले की,’रोज भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात येतात. तसेच ते कालही आले आणि म्हणाले की ,समाजवादी सरकार स्थापन होणार आहे.’ तसेच पुढे यादव म्हणाले की,’भाजप अनेकदा रामराज्याविषयी बोलतो पण प्रत्यक्षात समाजवादाचा मार्ग हा रामराज्याचा मार्ग आहे आणि ज्या दिवशी समाजवाद पूर्णपणे लागू होईल, त्या दिवसापासून रामराज्य सुरू होईल.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ज्या व्यक्तीवर सर्व गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत, त्यांना भाजपने मुख्यमंत्री केले. भाजपचे अनेक नेते जे वयोवृद्ध आहेत, जे अनेक वर्षे रक्त आणि घाम गाळून पक्ष मजबूत करत होते, ते म्हणतात आम्ही पक्षासाठी रक्त आणि घाम गाळून कष्ट करतो. पण ते कुठून आले हे कोणालाच माहीत नाही, अशा लोकांना आमच्या डोक्यावर बसवण्यात आले आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!