🕒 1 min read
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) हे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून यंदाही पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणाऱ्या प्रस्थापितांच्या सरकारचं ओबीसी प्रेम फसवं आहे. ओबीसीवर तुम्हाला प्रेम असेल तर भाजप सर्वच जागेवर ओबीसी उमेदवार देणार आहे,त्यांना निवडूण द्या. अन्यथा तुम्हीही फक्त ओबीसी उमेदवार देणार,असे तरी जाहीर करा, असे पडळकर म्हणाले आहेत.
यासंदर्भात पडळकरांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की,’सर्वोच्च न्यायलयानं ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करेपर्यंत यांनी दिड वर्ष नुसत्या तारखा घेतल्या. केंद्राच्या नावाने ओरड केली. आता मात्र यांची पायाखालची जमिन सरकलेली आहे. आत्ताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहीती नाही. राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहे.’
ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणाऱ्या प्रस्थापितांच्या सरकारचं #OBC प्रेम फसवं आहे.#OBC वर तुम्हाला प्रेम असेल तर @BJP4Maharashtra सर्वच जागेवर #OBC उमेदवार देणार आहे,त्यांना निवडूण द्या.अन्यथा तुम्हीही फक्त #OBC उमेदवार देणार,असे तरी जाहीर करा.@AjitPawarSpeaks @NCPspeaks pic.twitter.com/NwQ6Ta7pBA
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) January 4, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’इंपेरिकल डेटा गोळा होईपर्यंत निवडणूका आम्ही घेणार नाहीत, वेळ पडली तर प्रशासक नेमू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणतात. याचा अर्थ आपल्या मर्जीतील अधिकारी प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा, हाच हेतू दिसतोय. ओबीसींवर तुम्हाला एवढंच प्रेम असेल तर भारतीय जनता पक्ष सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवार देणार आहे, त्यांना आपण निवडूण द्यावं. अन्यथा तुम्हीही फक्त ओबीसीच उमेदवार देणार आहात, असे तरी जाहीर करावे’, असे पडळकर म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊतांनी गोव्यात घेतली काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- ‘माफी मागितली की आपण नवीन घोळ घालायला मोकळे असंच ना?’, भातखळकरांचे टीकास्त्र
- …त्यामुळे साहजिकच पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारच निर्णय घेणार- अतुल भातखळकर
- ‘..तरी चीनचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांबरोबर फाफडा, ढोकळा खाताना दिसतील’, संजय राऊतांचा टोला
- ‘…पण अखेर त्याने मला गाठलंच’, पॉझिटिव्ह आल्यानंतर रोहित पवार यांची भावनिक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
