Share

“अडीच लाख मानधन, २.९ कोटींची मालमत्ता, मग तुम्ही मजूर कसे?”, दरेकरांना सहकार विभागाचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते तथा भाजप नेते प्रविण दरेकरांना (Pravin Darekar) सहकार विभागाने मोठा धक्का दिला आहे. प्रविण दरेकर मजूर नसल्याचे कारण सहकार विभागाने देत त्यांचा संचादक पदासाठीचा दावा फेटाळला आहे. त्यामुळे हा प्रविण दरेकरांसह भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरेकरांच्या अंगावरुन विजयाचा गुलाल उतरण्याआधीच ते अपात्र ठरल्याने त्यांच्या समर्थकात नाराजी पसरली आहे.

दरम्यान, विरोधकांनी सहकार विभागाकडे तक्रार केली आहे. त्यात प्रविण दरेकरांचे उत्पन्न त्यांना मिळणारे मानधनाचे कागदोपत्री पुरावे सहकार विभागाकडे देऊन त्यांचा संचालक पदासाठीचा दावा अपात्र ठरवण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. मात्र दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले आहे. तसेच त्यांनी याच प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले आहे.

त्यामुळे सहकार विभागाने त्यांचा दावा फेटाळताना नमुद असे नमुद केले की, ‘तुमची स्थावर मालमत्ता २.९ लाख रुपये असून विधान परिषद सदस्य आणि विरोधी पक्षनेते म्हणूनही तुम्हाला २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला मजूर म्हणता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवत आहे, असे सहकार विभागाने आदेशात म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!