Share

ठाण्यात मंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबीरास प्रारंभ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील (Children between the ages of 15 and 18) मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून म्हणजेच ३ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान ठाण्यातील वर्तकनगर येथील ब्राम्हण विद्यालय येथे मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबीरास प्रारंभ झाला.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल अनेक तज्ञ भाकीत व्यक्त करत असतानाच दुसरीकडे लसीकरणात कोणताही खंड पडू द्यायचा नाही हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना त्यांच्याच शाळेत लसीकरण देण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. दरम्यान रविवारी ११ वाजेपर्यंत ८ लाख मुलांकडून लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली. अशी माहिती कोवीन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी दिली आहे.

दरम्यान लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल वेगळी असणार आहे.भारत सरकारने लहान मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे.भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila’s ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!