🕒 1 min read
मुंबई :कोरोनाने पुन्हा एकदा कहर सुरू केला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव बॉलीवूडमध्ये वेगाने पसरत आहे. अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल (Priya Runchal) हे कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झाले आहेत. जॉनने स्वत: सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
दरम्यान जॉन अब्राहमने सांगितले की, ”तीन दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो, ज्याच्याबद्दल मला नंतर कळले की तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. आता प्रिया आणि मला संसर्ग झाला आहे. आम्ही दोघेच घरी आहोत, यामुळे कोणाच्या संपर्कात येत नाही. सर्वांनी काळजी घ्या.”

सोशल मीडियावर जॉन अब्राहमने लिहिले की, ”आम्ही दोघे पूर्णपणे लसीकरण केले आहोत. आम्हाला सौम्य लक्षणे आहेत. कृपया स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी रहा. मास्क जरूर घाला.” याआधी रविवारी दिग्दर्शक राहुल रवैलही (directors Rahul Rawail) कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राहुल रवैल देखील क्वारंटाईनमध्ये आहे. करीना कपूर, अर्जुन कपूर, रिया कपूर, शनाया कपूर, सीमा खान आणि सोहेल खान यांचा धाकटा मुलगा योहान देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते. नुकतेच दोन टीव्ही कलाकार नकुल मेहता आणि अर्जुन बिजलानी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांना अजित पवारांनी केले अभिवादन
- ज्ञानज्योती सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांना “भारतरत्न” मिळाला पाहिजे- रुपली पाटील ठोंबरे
- आजपासून देशात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणास सुरवात
- योगी सरकारची कायदा आणि सुव्यवस्थेवर पकड; मोदींकडून कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
