Share

युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले(Savitribai Phule) यांचा जन्म झाला. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. यानिमित्ताने सर्व स्तराहून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी ट्विटच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे.

ट्विटमध्ये अमोल कोल्हे म्हणाले आहेत की,’क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे संपूर्ण आयुष्य दीपस्तंभाप्रमाणे असंख्य पिढ्यांना मार्गदर्शन करीत आहे. युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या त्या रणरागिणी होत्या. हातात खडू घेऊन क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या सोबत त्यांनी शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली.’

दरम्यान, त्यांचे हे कार्य युगप्रवर्तक आहे. त्यांच्या योगदानास वंदन करण्यासाठी सावित्रीमाई फुले यांचा जन्मदिवस ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा जागर करुयात. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन,असे कोल्हे ट्विटमध्ये म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!