🕒 1 min read
नवी दिल्ली : सेंच्युरियन कसोटी (SA vs IND) सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव करून विराट कोहलीने (virat kohli) कर्णधार म्हणून मोठी कामगिरी केली आहे. दोन बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीने यापूर्वी ऑस्ट्रेलियात बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातही विजय मिळवला होता.
2018 मध्ये भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, यजमानांना बॉक्सिंग डे कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मेलबर्नमधील हा सामना टीम इंडियाने जिंकला होता. त्या मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. यानंतर आता भारताने सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव केला आहे. अशा प्रकारे कोहलीच्या खात्यात दोन बॉक्सिंग डे कसोटी सामने जिंकले.
भारतीय संघाने सलग तीन बॉक्सिंग डे कसोटी सामने जिंकले आहेत. यापूर्वी 2020 मध्येही भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यावेळी अजिंक्य रहाणे संघाचा कर्णधार होता आणि भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या मालिकेतही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला होता.
Cannot ask for a better end to 2021! ???? ????@28anand captures the essence and vibes in Centurion post #TeamIndia's historic Test win at SuperSport Park. ???? ???? #SAvIND
Watch the full video ???? ????https://t.co/49IFMY2Lxl pic.twitter.com/PnIaswqsH7
— BCCI (@BCCI) December 31, 2021
सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम खेळताना पहिल्या डावात 327 धावा केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 197 धावांवर बाद झाला. यातून भारतीय संघाला मोठी आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावातही टीम इंडियाचा खेळ चांगला राहिला नाही. भारतीय संघ 174 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला 305 धावांचे लक्ष्य मिळाले जे त्यांना पूर्ण करण्यात अपयश आले. दक्षिण आफ्रिकेचा संघ १९१ धावा करून बाद झाला. शतकासाठी केएल राहुलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेची पोस्ट
- सिंधुदुसिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला-चंद्रकांत पाटील
- सिंधदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- कंगनाने केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे आणखी एक तक्रार दाखल
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने चारली ‘मविआ’ला धूळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
