Share

‘राज्याचं कुटुंबप्रमुख असलेलं मायबाप सरकार खरचं आपली जबाबदारी निभावतयं का?’

Published On: 

🕒 1 min read

महाड : काही दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील आदीस्ते गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरपंच मीनाक्षी खिडबीडे(वय ४७) यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. २७ (डिसें.)रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चूलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी मीनाक्षी घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास रस्त्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह गावातील एका व्यक्तीला दिसून आला. त्यामुळे नजीकच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेवर आता संतप्त प्रतिक्रिया येत असून याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी मीनाक्षी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

यासंदर्भात माहिती देत चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’माझ्या आईने कायम लोकांचं भलचं केलं तरी का तिला मारून टाकलं?आमचं घर उध्वस्त झालयं..ताई त्या नराधमाना सोडू नका’, हा आकांत आहे आदिस्ते गावच्या महिला सरपंच मिनाक्षी खिडबीडे वर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यातं आली तिच्या मुलाचा. अशा परीस्थितीत त्याचे काय सांत्वन करावं, शब्दचं संपले. मीनाक्षीच्या पतीला आमच्यासमोर दोन वेळेस आकडी आली घरात वयोवृद्ध आई..आभाळचं फाटलयं.

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’मीनाक्षीच्या दरवाजावर ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ असं स्टीकर होतं. या राज्याचं कुटुंबप्रमुख असलेलं मायबाप सरकार खरचं आपली जबाबदारी निभावतयं का? अशा मिनाक्षी रोज कुठे ना कुठे मरताहेत सरकार मात्र फक्त स्टीकरमध्येचं उरलयं’, असे म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!