🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वापरात असलेल्या गाड्यांमध्ये आता मर्सिडीज या आलिशान कार बनविणाऱ्या जर्मन कंपनीची निर्मिती असणारी मेबॅच एस६५० या गाडीचा सामावेश झाला आहे. ही गाडी जागतील सर्वात महागड्या बुलेट प्रूफ गाड्यांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आता यावरूनच काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधत टीका केली आहे.
‘हम तो फ़कीर आदमी है, झोला ले के चल पड़ेंगे जी!’ असे ट्वीट करत सचिन सावंत यांनी मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मेबॅच एस६५० गार्ड ही गाडी सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक आहे. या गाडीला व्हीआर १० स्तराची सुरक्षा असून ती सर्वांत महागडी गाडी आहे.
हम तो फ़कीर आदमी है, झोला ले के चल पड़ेंगे जी।???? https://t.co/ifqefNFaS5
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 28, 2021
दरम्यान पंतप्रधान मोदी नुकतेच या नव्या मर्सिडीज मेबॅच एस६५० गाडीमध्ये पहिल्यांदा हैदराबाद हाऊसच्या बाहेर दिसून आले. त्यामुळे मोदींच्या गाडीचीही आता चर्चा रंगताना दिसून येत आहे. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारतभेटीदरम्यानही मोदी यांनी हीच वापरली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई व्हावी- रुपाली ठोंबरे पाटील
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल; राष्ट्र्वादीचा इशारा
- रोहिणी खडसे हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार- चंद्रकांत पाटील
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- ‘संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?’, रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
