🕒 1 min read
मुंबई : रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. रविवारी या संसदेचा समारोप झाला. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या धर्म संसदेत अकोल्याच्या कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल(Mahatma gandhi) अपशब्द वापरले. फक्त एव्हढेच नाही तर महात्मा गांधींवर शिवीगाळ करत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुकही केले. या प्रकरणानंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी चंद्रपूर येथील राजुरा नगर परिषद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. मात्र पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना त्यांनी पुतळ्याच्या भागावरच पाय दिला. यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज(Shivaji Maharaj) यांचा अपमान केल्याचे म्हटले आहे.
महाआघाडी सरकारमधील मंत्री @VijayWadettiwar यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याचा भागावरच पाय ठेवला…@OfficeofUT काय ॲक्शन घेणार वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार? pic.twitter.com/Ire1qbJ798
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 27, 2021
तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’दोषी कोणी असो कारवाई व्हायलाच हवी. गांधीजींचा अपमान करणारा कालीचरण अथवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे वडेट्टीवार’, असे ते म्हणाले आहेत.
दोषी कोणी असो कारवाई व्हायलाच हवी गांधीजीचा अपमान करणारा कालीचरण अथवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे @VijayWadettiwar. https://t.co/CTWtrGnH1E
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 27, 2021
दरम्यान, वडेट्टीवार यांनी उपाध्येंच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले असून ते म्हणाले आहेत की,’हा पूर्णतः खोडसळपणा आहे. केशव उपाध्ये यांनी डोळे उघडून बघावे. त्यांनी आंधळ्या भक्तांसारखे बघू नये. मी हार घालताना महाराजांच्या शेजारी माझा पाय आहे. पायावर पाय नाही. त्यामुळे अंध भक्त म्हणू नका. मी आव्हान करतो की, तो व्हिडिओ परत दाखवावा. माझ्याकडे तो व्हिडिओ घेऊन यावा. माझ्याकडे ती संपूर्ण क्लिप आहे. जर व्हिडिओ बारकाईने बघितला तर दिसेल की, पायाच्या शेजारी मी पाय ठेवला आहे. माझी हाईट कमी असल्याने मी पुतळ्याच्या शेजारी उभा राहिलो.मात्र भाजपला मुद्दामहून खोडसाळपणा करण्याची सवय आहे. काही विद्रूप लोक मुद्दामहून माझे नाव बदनाम करण्याचे कृत्य करत आहे’, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणा संदर्भात विधिमंडळात महत्वाचा ठराव मंजूर; छगन भुजबळांची माहिती
- ‘…त्यामुळे अशा देणग्या गोळा कराव्या लागतात राऊत साहेब’, राऊतांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
- ‘विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच भाजपचा उदात्त हेतू’
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
