Share

ओबीसी आरक्षणा संदर्भात विधिमंडळात महत्वाचा ठराव मंजूर; छगन भुजबळांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होत आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. असे असतांनाच ओबीसी आरक्षणा संदर्भात विधिमंडळात महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(chhagan  Bhujbal) यांनी दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना भुजबळ यांनी सांगितले की,’ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत आणि तशा पद्धतीने निवडणूक आयोगाला माहिती देण्यात यावी, असा एक ठराव विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या संगनमताने सभागृहात मंजूर केला आहे.’ तसेच यासंदर्भातला सर्वपक्षीय ठराव आज(२७ डिसें.) सभागृहात घेण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ओबीसी आरक्षण संदर्भात केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली असून यात महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत जो निर्णय देण्यात आला आहे, त्याबद्दल आम्ही वकिलाचा सल्ला घेत आहोत. शिवाय केंद्र सरकारच्या या याचिकेला साथ देण्यासाठी आम्हीही सामील होणार आहोत’, असेही भुजबळ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!