Share

‘भाजप कार्यकर्त्यांवरील खोट्या केसेस थांबवा अन्यथा..’, नारायण राणेंचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गात सुडाचे राजकारण व दडपशाही सुरू केली आहे. कोणतीही खातरजमा न करता पोलिसांनी सुरू केलेले अटकसत्र तत्काळ थांबवावे. अन्यथा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

नारायण राणे जिल्हा बँक निवडणूक व चार नगरपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणूक पार्श्वभूमीवर बोलत होते. यावेळी त्यांनी  म्हटले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दडपशाही चालविली आहे. या दडपशाहीला खतपाणी घालण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. भाजप कार्यकर्त्यांवर अटक मोहीम चालवली जात आहे. मात्र हे अटकसत्र त्यांनी थांबवले नाही, तर एसपी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढू ,असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. राज्यातील महाविकास आघाडी सर्व बाबतीत निष्क्रिय ठरली असून कोणतेही प्रश्न सोडण्यात अपयशी ठरली आहे. मुख्यमंत्री असून नसल्यासारखे आहेत. कणकवलीमध्ये एका कार्यकर्त्याला मारहाण झाली, या घटनेबाबत आमदार नितेश राणे, संदेश सावंत यांना पोलीस वारंवार बोलावून सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!