🕒 1 min read
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी(Atal Bihar Vajpayee) यांची २५ डिसें.रोजी जयंती होती. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाने निधी उभा करण्यासाठी ‘माइक्रो डोनेशन अभियान’सुरु केले आहे. हे अभियान ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राबवले जाणार आहे. दरम्यान, विविध कारणांमुळे हे अभियान चर्चेचा विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले . कालपर्यंत वाटत होते असंख्य हुतात्मे , स्वातंत्र्यवीर , महात्मा गांधी , पंडित नेहरू , सरदार पटेल , इंदिरा गांधी , डॉ.आंबेडकर यांच्यासह मेहनत करून घामाचे शिंपण करणारे लोक, शास्त्रज्ञ, सैन्य यांच्यामुळे आपला देश बलाढय़ होत जाईल , पण हे सर्व कुचकामी असून भाजपच्या देणगीच्या पावत्या फाडल्याने देश मजबूत होईल . यामुळे देश आणखी बलाढय़ खरंच होईल ? लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर देणगी मोहिमेचे स्वागत करायला हरकत नाही’, असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’भारतीय जनता पक्षाने जनतेकडे देणगीसाठी आवाहन केले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपकडून देणगी हे अभियान सुरू करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा वगैरेंनी पक्षाला प्रत्येकी एक हजार रुपयांची देणगी देऊन पैसे दिल्याची पावती सोशल मीडियावर झळकवली आहे. मोदी-शहांनी देणगीची पावती समाज माध्यमांवर फडकवताच पक्षाचे इतर नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी वगैरे बड्या मंडळींनीही पक्षनिधीच्या पावत्या फाडल्या. पक्षासाठी अथवा राजकीय कार्यासाठी देणग्या घेणे यात अजिबात गैर नाही’, असेही राऊत म्हणाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गोपीचंद पडळकरांवर झालेल्या हल्ल्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य
- विधानसभा निवडीबाबत आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा; राज्यपाल म्हणाले…
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घ्या; बाळासाहेब थोरातांची मागणी
- पवार साहेबांचा वारसा यशस्वीपणे चालवत असल्याचे अजित दादांनी आज सिद्ध केले- रुपाली पाटील
- ‘मी ‘त्या’ खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
