🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक या सदरातून पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे. दिल्लीच्या राजकारणात स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत व राजकीय विरोधकांना ते रोज अपमानित करीत आहेत. खासदार जया बच्चन (Jaya Bacchan) यांनी राज्यसभेत संतापाने उभे राहून सरकार पक्षाला ‘तुमचे बुरे दिन लवकरच सुरु होत आहेत’ असा शाप दिला होता. अशी टीका संजय राऊतांनी रोकठोक सदरातून केली आहे.
संजय राऊत लिहितात, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संपूर्ण कफन ओढून सरकारी पक्षाने संसदेचे अधिवेशन संपवले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या १२ राज्यसभा खासदारांचे निलंबन शेवटपर्यंत रद्द केले नाही. हे बारा खासदार शेवटपर्यंत संसद भवनासमोरील गांधी पुतळ्यापाशी बसून राहिले.
लोकशाहीत विरोधकांच्या वर्तनावर नेहमी बोट दाखविले जाते, पण सत्ताधाऱ्यांचे वर्तन हे कितीही बेकायदेशीर असले तरी त्यांच्याकडे कोणी बोट दाखवीत नाही. राज्यसभेत जया बच्चन संतापाने थरथरत उभ्या राहिल्या व म्हणाल्या, ‘मी तुम्हाला शाप देत आहे. तुमचे बुरे दिन लवकरच सुरू होत आहेत. तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे चूक आहे. आमचा गळाच एकदाचा घोटून टाका. लोकशाही संपूर्ण खतम करा,’ असे श्रीमती बच्चन म्हणाल्या.
तेव्हा संसदेची ती ऐतिहासिक इमारतही क्षणभर थरथरली असेल. विरोधी पक्षाचा इतका अवमान यापूर्वी कधीच झाला नसेल. पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारात अडकले. संसदेला वाऱ्यावर सोडले आणि लोकशाही संसद भवनासमोरील गांधी पुतळ्यापाशी उघड्यावर पडली असे चित्र दिसले. ते विदारक होते.
कुत्र्यांची निष्ठा
जुन्या ‘मातोश्री’ निवासस्थानी श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत एक वाक्य कोरलेली पाटी होती. त्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत.
‘The more I see off the representatives of the people, the more I admire my dogs.’
– Lamartine
”जो जो मी निर्वाचित जनप्रतिनिधींचे चाळे पाहतो तो तो मला माझ्या कुत्र्यांची जास्तच प्रशंसा करावीशी वाटते.
– लामरटीन
यावर श्री. बाळासाहेब ठाकरे चिरुटाचा धूर सोडत म्हणत, ‘तुम्ही कुत्र्यांचा यात अपमान करीत आहात! माणसांपेक्षा ते एकनिष्ठ असतात!’
आज दिल्लीच्या राजकारणात स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे वावरत आहेत. ते विरोधकांना कुत्र्यांसारखे वागवीत आहेत. पण दिल्लीचा इतिहास असे सांगतो, ‘Every dog has his days.’ हे जगभरातील राजकारणात अनुभवण्यास येते. त्यावर भाजपचेच एक कोंडमारा झालेले मंत्री हळूच म्हणाले, ‘dog चे काय घेऊन बसलात. dog हा शब्द उलटा करून पहा, Every god has also his day!’ तेच खरे आहे. अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “नितेश राणेंच्या बालिशपणाने कोकणाची मान खाली गेली”
- “सफाई कामगाराने आत्महत्या केली, आता ३ जणांचे निलंबन करुन काय फायदा?”
- शाळेबाबत अद्याप निर्णय नाही; राजेश टोपेंची माहिती
- …म्हणून मेनका गांधींनी माझी भेट घेतली; आव्हाडांनी केला त्या भेटीचा खुलासा
- केंद्र सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत?; केंद्रीय कृषीमंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
