🕒 1 min read
मुंबई : दोन वर्ष वेतन न मिळाल्याने मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना २२ डिसेंबर रोजी मुंबईत घडली आहे. याप्रकरणी महापालिकेने प्रशासकीय अधिकाऱ्यासह एकूण ३ जणांना निलंबित केले आहे. यावर भाजप नेते आ. अतुल भातखळकर यांनी महापालिका प्रशासनासह शिवसेनेवर टीका केली आहे. आता तीन जणांचे निलंबन करुन काय फायदा? असा सवाल भातखळकरांनी केला आहे.
याबाबत आ. अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘मुंबई महापालिकेतल्या एखाद्या सफाई कर्मचाऱ्याला तब्बल २ वर्षे वेतन मिळत नसेल यावर कसा विश्वास ठेवायचा? २७ वर्षाच्या या दुर्देवी सफाई कामगाराने शेवटी विष पिऊन आत्महत्या केली. आता ३ जणांचे निलंबन करून काय फायदा? टक्केवारी घ्या पण पगार द्या, अशी अवस्था मनपा कर्मचाऱ्यांवर आली आहे’. अशी टीका आ. भातखळकरांनी केली आहे.
मुंबई महापालिकेतल्या एखाद्या सफाई कर्मचाऱ्याला तब्बल २ वर्षे वेतन मिळत नसेल यावर कसा विश्वास ठेवायचा?
२७ वर्षाच्या या दुर्देवी सफाई कामगाराने शेवटी विष पिऊन आत्महत्या केली. आता ३ जणांचे निलंबन करून काय फायदा?
टक्केवारी घ्या पण पगार द्या,अशी अवस्था मनपा कर्मचाऱ्यांवर आली आहे. pic.twitter.com/GQ4Ya1RDvV— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 25, 2021
रमेश परमार (वय २७) असे आत्महत्या केलेल्या सफाई कामगाराचे नाव आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर रमेश परमार यास महापालिकेने सेवेत समावून घेतले होते. सफाई कामगार म्हणून पालिकेच्या पी दक्षित प्रभगात त्याची नियुक्ती करण्यात आली. त्याच्या कागदपत्रावर ऑगस्ट २०२० मध्ये महापालिकेच्या लेखा अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवल्यावर परमार याने कागदपत्रांची पूर्तता केली नाही. असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या नैराश्यातून रमेश परमार याने २२ डिसेंबरला आत्महत्येचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा २३ डिसेंबरला मृत्यू झाला. महापालिकेने केलेल्या प्राथमिक चौकशीत पी-दक्षिण विभागाच्या घनकचरा विभागाचे पगारीबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याचे आढळले. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत?; केंद्रीय कृषीमंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य
- रवी शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याचे माजी क्रिकेटरने केले समर्थन
- “माझ्या अनेक मुद्द्यांना मंत्र्यांनी बगल दिली”, प्रविण दरेकरांचा आरोप
- ‘हा सण सर्वांच्या जीवनात आनंद,समाधान,समृद्धी,उत्तम आरोग्य,प्रेम आणि अहिंसा घेऊन येवो’
- कोरोनाचे संकट लवकरच पूर्णपणे दूर व्हावे, हीच प्रभू येशू यांच्याकडे प्रार्थना- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
