Share

शाळेबाबत अद्याप निर्णय नाही; राजेश टोपेंची माहिती

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरत आहे. राज्यातील पुण्यात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील कोरोना परिस्थिती आणि राज्यातील शाळांबाबतचा निर्णय सांगितला आहे.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच राहिल असं सांगतानाच राज्यातील शाळेबाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. शाळा जशाच्या तशा सुरू राहतील, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले आहे. ‘राज्यात लागू केलेल्या जमावबंदीला सहकार्य करावे. क्रिसमस, नववर्ष या उत्सवाच्या वातावरणामध्ये अधिक गर्दी करु नये, या दृष्टीकोनातून जमावबंदीचे निर्णय घेतला आहे’, असेही राजेश टोपे म्हणाले आहेत.

ऑक्सिनच्या अनुषंगाने आपण लॉकडाऊन ठरवणार आहोत. ज्या दिवशी 800 मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची 800 मॅट्रीक टनाची आवश्यकता 500 मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे. मात्र, ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नये. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!