Share

औरंगाबाद स्मार्ट सिटी बस बंद; रिक्षाचालकांनी वाढवले भाडे, मुलांना शाळेत सोडण्यात पालकांची दैना..

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा थेट परिणाम शहर बस सेवेवरही झालेला आहे. एसटीचा संप सुरू होण्याआधी साडेचारशे विद्यार्थ्यांनी बसचे पास काढलेले होते. त्याचप्रमाणे सोमवारपासून शहरातील शाळाही सुरू झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पेट्रोलचे भाव वाढल्याने रिक्षाचालकांनी आपल्या भाड्यामध्ये वाढ केलेली आहे. एकीकडे एसटी संपामुळे स्मार्ट सिटी बस बंद आणि दुसरीकडे रिक्षाचालकांनी वाढवलेले भाडे या एकूणच परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची मात्र दैना होत आहे.

शहर बस सेवेत महामंडळाचे चालक आणि वाहक कार्यरत असल्याने एसटी महामंडळाच्या संपाचा थेट परिणाम स्मार्ट सिटी बसवर झाला आहे. दररोजच्या प्रवासात स्मार्ट सिटी बसचा औरंगाबादकरांना मोठा आधार आहेच मात्र त्याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थ्यांनाही स्मार्ट सिटी बसचा आधार होता. साधारणत: कोविडनंतर शहरातील विविध मार्गांवर ४५ स्मार्ट सिटी बसच्या दररोज एकूण ५०० फेऱ्या सुरु होत्या. मात्र एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे शहर बसही बंद आहे. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाही. तोपर्यंत शहर बसही सुरू होणार नाही.

कोणाचा पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र प्रादूर्भाव वाढताच पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे सलग दोन वर्षे ऑनलाइन माध्यमातून शाळा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत सोडण्यासाठी लावलेल्या रिक्षाचालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मात्र आता दोन वर्षांनंतर पुन्हा शाळा सुरू झाल्यामुळे पालकांनी रिक्षावाल्यांना भाड्याविषयी विचारणा केली असता झालेली वाढ पाहून पालकांनी तोंडातच बोटे घातली. मात्र दिड ते दोन वर्षांपूर्वी पेट्रोलचे भाव आणि आत्ताचे भाव यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने भाढेवाढीशिवाय पर्याय नसल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!