🕒 1 min read
मुंबई : देशभरात आजचा दिवस अर्थातच २३ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय किसान दिन’ म्हणून साजरा केला जातो. खरे तर भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह(Chaudhari Charansingh) यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. चरणसिंह यांनी देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी भरीव कामगिरी केली आहे. दरम्यान, राष्ट्रीय किसान दिनानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आपल्या कृषीप्रधान भारतीय समाजाचा पाया म्हणजे अन्नदाता शेतकरी. विकासपुरुष मा. नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासालाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सर्व शेतकरी बंधू-भगिनींना राष्ट्रीय किसान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.’
आपल्या कृषीप्रधान भारतीय समाजाचा पाया म्हणजे अन्नदाता शेतकरी ! विकासपुरुष मा. नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासालाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सर्व शेतकरी बंधू-भगिनींना राष्ट्रीय किसान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! pic.twitter.com/3vsDe2ERUm
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 23, 2021
दरम्यान, पंतप्रधान चौधरी चरणसिंग हे अत्यंत कमी काळासाठी पंतप्रधान असले तरी त्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक परिश्रम घेतले आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनाही सुरू केल्या. तसेच २००१ साली शेतकर्यांचे जीवन आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणं सुरु करणाऱ्या चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय किसान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही; कारण..’
- “पडळकरांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने…”
- वाजपेयीजींना विसरून चोर दाराने उद्योग करायचा असेल तर ते योग्य नाही- नवाब मलिक
- “राज्य विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का?”,पडळकरांच्या टीकेवर मिटकरींचे प्रत्युत्तर
- सचिन सावंतांनी शेअर केला मोदींचा लोकसभेतील ‘तो’ व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
