🕒 1 min read
मुंबई : गत दीड ते दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संप पुकारला (Maharashtra ST bus strike) आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ केली तरीही एसटी कर्मचारी संघटना संप मागे घेण्यास तयार नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, ‘बस सुरु नाही म्हणून पोरं पाच सहा किलोमीटर पायपीट करत आहेत. लांबच्या गावाच्यां मुलांची तर शाळाच बुडत आहे. बरं झालं असतं मुख्यमंत्र्यांसारखं घरी बसून मुलांनाही शिक्षण घेता आलं असतं. ‘ अशी टीका सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
शाळा सुरू झाल्या…..
बस सुरु नाही म्हणून पोरं पाच सहा किलोमीटर पायपीट करत आहेत..
लांबच्यागावाच्यांची तर शाळाचं बुडत आहे.
बरं झालं अस्त मुख्यमंत्र्यांसारखं घरी बसून मुलांनाही शिक्षण घेता आलं अस्त.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 21, 2021
एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीपासून एसटीचे विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संप पुकारला आहे. तो अद्यापही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतनात ४१ टक्के वाढ दिली, विलीनीकरणासाठी समितीही नेमण्यात आली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी लाखो प्रवाशांना वेठीस धरून संप सुरूच ठेवला आहे. संप मागे घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन करुनही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळे विरोधकांतून राज्य सरकारवर प्रचंड टीका केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील १०५ नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
- …त्यामुळे राष्ट्रपती आता वाट बघत आहेत; चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा
- “संजय राऊत आणि कंपनी शिवसेनेला…”; बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत राम सातपुतेंची टीका
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ४९ विषयांसाठी २३१ प्राध्यापकांची निवड; रुजू होण्याचे आदेश
- ‘निवडणूक कायदा दुरुस्ती’ विधेयक लोकसभेत मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
