Share

…तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून उघड्यावर पडलेली लोकशाही आणि स्वातंत्र्य याविषयी भाष्य केले आहे. १२ खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर राज्यसभा तर ठप्प पडली आहे. पंतप्रधान काशीला गेले, पण पंधरा दिवसांत ते संसदेत म्हणजे लोकशाहीच्या ‘काशी’त फिरकले नाहीत. देशाच्या संसदीय लोकशाहीची गंगा गढूळ होत असल्याचेही राऊत म्हणाले आहेत.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,”सत्यमेव जयते’ हे देशाचे बोधचिन्ह काढून टाकून तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची वेळ देशावर सध्या आली आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत उभी दरी पडली आहे. ज्या आणीबाणीच्या विरोधात इतक्या वर्षांनंतरही डंका पिटला जात आहे त्या काळातही इंदिरा गांधी व विरोधकांतील संवाद संपूर्णपणे संपला नव्हता. यशवंतराव चव्हाण, स्वर्णसिंग, जगजीवनराम, इंदरकुमार गुजराल अशी मोठी माणसे इंदिरा गांधींच्या कॅबिनेटमध्ये होती. त्या तुलनेत सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील चेहरे कोण, त्याचा खुलासाही करता येत नाही. अरुण जेटली हे राज्यसभेचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर सुरू झालेली घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. विरोधी पक्षाने संयम सोडला तरी सत्ताधाऱ्यांनी मर्यादा पाळायच्या असतात, कारण देश व संसद चालवण्याची जबाबदारी त्यांची असते. सध्या राज्यसभेचे काम पूर्ण थांबले आहे. १२ सदस्यांचे बेकायदेशीर निलंबन झाले म्हणून विरोधक कामकाज घडू देत नाहीत आणि सरकारच्या वतीने राज्यसभेचे नेते पीयुष गोयल हे गोंधळ वाढावा असे वर्तन करीत आहेत. हे असे कधीच घडले नव्हते.’

दरम्यान, ‘मी या सभागृहाचा सर्वाधिकारी आहे. मी तुमच्यावर कारवाई करू शकतो,’ असे सदस्यांना सांगणारे सर्वाधिकारी देशाचे उपराष्ट्रपती नायडू हे १२ खासदारांचे संरक्षण करू शकले नाहीत. त्यांचे निलंबन सरकारने करायला लावले व राज्यसभेचे अधिकार मातीमोल झाले. निलंबित १२ सदस्य गांधीजींच्या पुतळय़ाखाली १५ दिवसांपासून बसले आहेत. राज्यसभेचे सर्वाधिकारी त्यांची साधी विचारपूस करायला गेले नाहीत हे वेगळे, पण राज्यसभेचे उथळ नेते व संसदीय कार्यमंत्री विरोधकांची कशी जिरवली याच तोऱ्यात वावरताना दिसले. आश्चर्य असे की, भारतीय जनता पुन:श्च स्वतंत्र व्हावी म्हणून ज्या वीरांनी आणीबाणीच्या काळ्या कालखंडामध्ये झोटिंगशाहीशी निर्धाराने आणि अचूक झुंज दिली असे सांगतात, त्याच सूर्याच्या पिल्लांनी संसदेत व बाहेर लोकशाहीची मूल्ये पायाखाली तुडवायला सुरुवात केली आहे’, असेही राऊत लेखात म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!