Share

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची ठाकरे सरकारची तयारी सुरु!

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : राज्यात एसटी कर्मचारी(ST Workers) अद्यापही आंदोलन मागे घेण्याचे नाव घेत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याच्या दाट शक्यता आहेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एसटीचे कर्मचारी अद्याप ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून एसटी संप सुरूच आहे. हजारो एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यावरुन आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.

एसटी ही सर्वसामान्य माणसांसाठी आहे. ती आवश्यक सेवा असल्याने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर राहावे. यासाठी मेस्मा कायदा लावता येऊ शकतो. त्याचबरोबर सरकार लवकरच निर्णय घेईल, असेही अनिल परब म्हणाले आहेत.

कोणी नेता नसल्याने संपकरी एसटी कर्मचारी भरकटले आहेत. त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांना सांगितले आहे की, 20 तारखेला विलिनीकरणाचा निर्णय होईल. पण ते कशाच्या आधारे बोलत आहेत. हे माहिती नाही. त्या दिवशी न्यायालयाला समितीचा अहवाल सादर होईल, निर्णय होणार नाही, असे अनिल परब म्हणाले आहेत.

निलंबनानंतर त्या कर्मचाऱ्यांना आता बडतर्फ केले जाऊ शकते, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना दिला आहे. या ठिकाणी ते मुक्कामाला आहेत. या ठिकाणापासून अवघ्या 100 मीटरवर एसटी आंदोलक आहेत. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून अनिल परब यांच्याभोवतीची सुरक्षा आणखी मजबूत केली आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांवर लवकरच मेस्मा लावण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. कारण आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मेस्मा लावण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने वारंवार आवाहन करूनही मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी कामावर हजर राहिले नाहीत, त्यामुळे राज्य सरकार सध्या कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्माच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. मेस्मा लावण्याबाबत राज्य सरकार सध्या कायदेशीर बाजू तपासून घेत आहे, लवकरच याबाबत परिवहन खाते निर्णय घेण्याची शक्याता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!