🕒 1 min read
मुंबई: गेल्या अनेक आठवड्यांपासून एसटी कामगारांचे (ST Workers on strike) संप सुरू आहे. एसटी सेवा बंद असल्याने सामान्य नागरिकांचे त्याच सोबत ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकार हे संप मागे घेण्यात यावे यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे पगारवाढ देखील करण्यात आली आहे. पगारवाढ जरी करण्यात आली असली तरी देखील एसटी कर्मचारी विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्यामुळे अद्याप हे आंदोलन मागे घेतलं गेलं नाही.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा सेवेत रुजू व्हावे यासाठी राज्यसरकारने अनेकवेळा अल्टीमेटम देखील दिले आहे. त्याच सोबत जे कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू होतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही, असं देखील सांगण्यात येत आहे. तसेच संपकाळात निलंबित झालेले कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर हजर झाल्यास त्यांचे निलंबन रद्द करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी शुक्रवारी केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यभरातील आगारातील गाड्यांचा तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.
उच्च न्यायालयात २० डिसेंबरला संपाबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नेमलेली समिती प्राथमिक अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. विलीनीकरणासंदर्भातील अंतिम अहवाल १२ आठवड्यांपर्यंत म्हणजेच २० जानेवारीपर्यंत उच्च न्यायालयाला मुख्यमंत्र्यांद्वारे सादर करण्यात येईल. दरम्यान जे कर्मचारी कामावर हजर राहतील त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार आहे.
तसेच अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर बोलताना अनिल परब म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या दुर्दैवी असून काही आत्महत्येची कारणे वेगळी असू शकतात. प्रत्येक आत्महत्येचा संपाशी संबंध जोडला जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच कामावर घेतले नाही, संधी दिली नाही म्हणून आत्महत्या करतो असे कुठे होऊ नये, म्हणून आम्ही पुन्हा सेवेत रुजू होण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट करत सोमवारपर्यंत कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होऊ शकते, असे संकेत देखील अनिल परब यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या ‘त्या’ ट्विटवर केशव उपाध्येंचा खोचक टोला; म्हणाले,’स्वतःच्या पक्षाशी…’
- ‘रोहित शर्माला फक्त T20 संघाचा कर्णधार व्हायचे नव्हते तर…’, कर्णधाराबाबत धक्कादायक माहिती समोर
- ‘बाबर आजमसाठी पाकिस्तानचे खेळाडू जीवही देतील’
- झूम मिटिंगमध्ये 900 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढणारे CEO विशाल गर्ग सक्तीच्या रजेवर
- द. आफ्रिका दौऱ्यासाठी उपकर्णधार रोहितची जोरदार तयारी सुरू; पाहा सरावाचा व्हिडिओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
