🕒 1 min read
मुंबई : आजचा दिवस(१६ डिसें.)संपूर्ण भारतात ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे १६ डिसेंबर १९७१ मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकले होते. या युद्धादरम्यान आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहींदांना आज श्रद्धांजली वाहिली जाते. या पार्श्वभूमीवरच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत या युद्धात शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांना अभिवादन केले आहे.
ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की,’विजयी भव..आजची तारीख पण साल होते १९७१ चे, इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्वाने जागतिक महासत्ता विरोधात असताना देखील आपल्या सैन्य शक्तीवर विश्वास ठेवत जगाच्या राजकीय नकाशावर नवीन राष्ट्र निर्मिती केली आणि भारत सुद्धा जगाचा नकाशा बदलू शकतो हे संपूर्ण जगाला दाखवले’, असे आव्हाड म्हणाले आहेत.
विजयी भव….
आजची तारीख पण साल होते १९७१ चे
इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्वाने जागतिक महासत्ता विरोधात असताना देखील आपल्या सैन्य शक्तीवर विश्वास ठेवत जगाच्या राजकीय नकाशावर नवीन राष्ट्र निर्मिती केली आणि भारत सुद्धा जगाचा नकाशा बदलू शकतो हे संपूर्ण जगाला दाखवले#इंदिरा_गांधी pic.twitter.com/9dJ1Cd4x5w— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 16, 2021
१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारताने विजय मिळवला, हा विजय केवळ भारताचा विजय नव्हता, तर क्रूरतेविरुद्ध मानवतेचा विजय होता. या विजयाला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धात शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांना विनम्र अभिवादन ! #SwarnimVijayVarsh pic.twitter.com/IIBgKI5yZD
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 16, 2021
दरम्यान, यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी देखील ट्वीट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारताने विजय मिळवला, हा विजय केवळ भारताचा विजय नव्हता, तर क्रूरतेविरुद्ध मानवतेचा विजय होता. या विजयाला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धात शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांना विनम्र अभिवादन.’
महत्वाच्या बातम्या
- तब्बल दीड वर्षांनी पुण्यातील शाळा आजपासून सुरू
- १९७१ च्या युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम- शरद पवार
- ‘राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना निवडणुका’
- आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भुजबळांची प्रतिक्रिया‘
- हा इतिहास संसदेत पाजळण्यापेक्षा मुंडे, राठोडांना सांगितला असता तर बरं झालं असते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
