मुंबई: पंतप्रधान मोदी यांची काशी यात्रा चांगलीच गाजली आहे. काशी हा मोदींचा मतदारसंघ आहे म्हणून नव्हे, तर मोदी काशीला जाऊन जे धार्मिक, आध्यात्मिक प्रयोग करीत असतात त्याची चर्चा बराच काळ होत असते. मोदी अधूनमधून केदारनाथलाही जात असतात. केदारनाथच्या गुंफेत ध्यानमग्न बसलेल्या पंतप्रधानांची छायाचित्रे मग जगभरात प्रसारित होतात. काशी यात्रेदरम्यान गंगेत डुबकी मारल्याचे छायाचित्र तसेच जगभरात पोहोचले आहे. असा खोचक टोला सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
मोदी हे पंतप्रधान असल्यामुळेच त्यांचे गंगास्नान प्रकाशझोतात राहिले. नाहीतर गंगेत रोज लाखो लोक डुबक्या मारीतच असतात. राहुल गांधी म्हणतात तेच खरे. इतके लोक गंगेत स्नान करतात, पण कॅमेरा फक्त मोदींवरच असतो. हा कॅमेरा व्यक्तीवर नसून पंतप्रधानांवर आहे. पाहू, काशी विश्वनाथाच्या मनात काय आहे?असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
दरम्यान ज्या गंगेच्या पात्रात पंतप्रधान मोदी यांनी डुबकी मारली त्याच गंगेत कोरोना काळात हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले. पंतप्रधान म्हणून नव्हे, तर काशीचे खासदार म्हणून मोदी यांनी त्या वेळी तेथे जायला हवे होते. मोदी आजच्या झगमगाटी वातावरणात तेथे गेले, पण गंगा आक्रोश करीत असताना काशीचे खासदार तेथे गेले नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी काशीत जाऊन गंगेत स्नान केले. त्या गंगास्नानाने त्यांच्या मनाची जळमटे दूर होवोत. विरोधकांविषयीची किल्मिषे नष्ट होवोत आणि काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणेच लोकशाहीच्या मंदिराचाही जीर्णोद्धार होवो अशी आशाही संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवरायांचा अवमान करणारी ‘ही’ भाजपाची छिंदम प्रवृत्ती’, तात्काळ माफी मागा; कॉंग्रेसची मागणी
- ‘अंगावर राख फासून, भगवी वस्त्रे परिधान करून, राज्यकर्त्यांना मंदिरे उभारता येतील पण…’
- घटस्फोटानंतर १६ वर्षांनी लहान असलेल्या अमृताशी बांधली गाठ; जाणून घ्या कोण आहे ‘तो’
- ‘सचिन वाझे, मुकेश अंबानी अन मुख्यमंत्री’… काय म्हणाले राज ठाकरे..?
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
