🕒 1 min read
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackrey) हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये महाविकास आघाडी सरकार पडेल असे वाटत नाही. असेही मत त्यांनी मांडले. त्याच बरोबर राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाने मोठी खळबळ उडाली आहे. ते म्हणाले सचिन वाझे(Sachin Vaze) हा शिवसेनेचा माणूस आहे तर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) मुख्यमंत्र्यांचे मित्र मग सचिन वाझेंनी अँटालियाखाली गाडी का ठेवली? असा सवाल उपस्थित करत त्यांनी हे प्रकरण भरकटल्याचे सांगितले.
राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी त्यांनी आपण निवडणुकीसाठी बाहेर पडलेलो नाही तसेच संभाजीनगरची निवडणूक आणखी काही महिने लांबणार असल्याचे देखील सांगितले. गेल्या २ वर्षांपासून कार्यकर्त्यांसोबत कुठल्याही प्रकारचा संवाद झालेला नव्हता. त्यासाठी आपण औरंगाबादला आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आर्यन खानचा प्रश्न हा रोजगारापेक्षा मोठा वाटतो.
त्याच्या बातम्या २८ दिवस रोज चालविल्या जातात. त्या तुलनेत महाराष्ट्रात भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे कोणाचेही लक्ष नसल्याचा टोला त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला. त्याच बरोबर निवडणुका लांबवण्यासाठी ओबीसी प्रकरण सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाला सामोरे जायला कोणीही तयार नाही ओबीसी समाजाने तर आमच्याकडे यानंतर मते मागायला येऊ नका अशा पाट्या लावल्या आहेत. त्यामुळे आता ओबीसी समाजाला सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील असे सूतोवाच त्यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद विभागातून आज धावल्या ४० बसेस; कर्मचारी संपावर ठाम
- राहुल गांधींची गळाभेट घेत राऊत म्हणाले, ‘आप आये बहार आयी’
- घटस्फोटानंतर १६ वर्षांनी लहान असलेल्या अमृताशी बांधली गाठ; जाणून घ्या कोण आहे ‘तो’
- गुणरत्न सदावर्तेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; न्यायालयात खेचण्याचा दिला इशारा
- औरंगाबाद विभागातून आज धावल्या ४० बसेस; कर्मचारी संपावर ठाम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
