🕒 1 min read
औरंगाबाद: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी अनेक विषयांना हात घातला तसेच पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली आहेत. यावेळी बोलताना त्यांनी नाशिकचे उदाहरण देत काही बाबतीत खंत देखील व्यक्त केली आहे.
नाशिकचे उदाहरण देताना राज ठाकरे म्हणाले, आजही नाशिकमध्ये मनसेने चांगले काम केले असे म्हटले जाते. असा विकास झाला नाही, असा उल्लेख केला जातो. इतर ठिकाणीही रस्त्यापासून ते पाण्यापर्यंतचे प्रश्न आहेत. मात्र, निवडणुकीच्यावेळी मुख्य मुद्दे बाजूलाच राहतात. नाशिकमध्ये पुढच्या ५० वर्षांसाठीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. मात्र निवडणुकीच्या वेळी या सर्व गोष्टींचा विसर पडत असेल आणि वेगळ्याच विचारांवर जर आपण मतदान करणार असूत तर कोण तुमच्याकडे चांगलं काम करेल असा प्रश्न पडतो, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, जर कामावर मतदान होणार नसेल तर मग समाज असा व्हायला लागतो की हे कामं बघून मतदान करत नाहीत, बाकीचेच गोष्टी बघून मतदान करतात. मग कामं करायची कशाला, कशासाठी रास्ते सुधारून पाहिजेत, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कशाचाही अर्थ राहणार नाही. सध्या तरी मला लोक फुकट घालवत आहेत, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या:
- मोठी बातमी! मला कोणीच वसूली करण्याचे आदेश दिले नव्हते; सचिन वाझेचा गौप्यस्फोट
- उर्फी जावेद ‘त्या’ व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल
- …म्हणून सारखे पेपर फुटतात; राज ठाकरेंनी सांगितलं पेपरफूटीचं कारण
- भाजपला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; 12 आमदारांच्या निलंबन स्थगितीला नकार
- महाविकास आघाडी सरकारबद्दल राज ठाकरेंचं मोठं वक्तव्यं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
