🕒 1 min read
मुंबई : निवडणूक आयोगाने राज्यातील सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता, त्यापैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली होती. याची आज मतमोजणी झाली असून दोन्ही जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.
अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. वसंत खंडेलवाल यांना ३३८ तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना ३२८ मतं मिळाली आहेत.
नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलावा लागला होता. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून नागपूर विधान परिषदेच्या जागेवर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली. काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. तर, छोटू भोयर यांना १ मत मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७८ मतांचा कोटा पूर्ण केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला’
- सामाजिक एकोप्यातून देशाची प्रगती-चंद्रकांत खैरे
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
