🕒 1 min read
अकोला : महाराष्ट्रातील नागपूर, अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana) या चार विधानपरिषदेसाठी (स्थानिक स्वराज्य संस्था) घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. अकोला (Akola) विधानपरिषदेच्या जागेवर भाजपाचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) हे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoriya) यांचा पराभव करत खंडेलवाल यांनी बाजी मारली आहे.
अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. वसंत खंडेलवाल यांना ३३८ तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना ३२८ मतं मिळाली आहेत.
अकोला –बुलडाणा–वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा दुरंगी सामना रंगल्याचे पहायला मिळाले.
विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील २२ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या ८२२ मतदारांपैकी ८०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव करत वसंत खंडेलवाल यांनी विधान परिषदेत प्रवेश मिळवला आहे. नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा येथील पराभवामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला’
- सामाजिक एकोप्यातून देशाची प्रगती-चंद्रकांत खैरे
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
