Share

सामाजिक एकोप्यातून देशाची प्रगती-चंद्रकांत खैरे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जगभरात हिंदुस्थान हे विविधतेने नटलेले धर्मनिरपेक्ष राष्ट्र ओळखले जाते. येथे येणाऱ्या प्रत्येक जाती धर्माचा आणि पंथाचा नागरिक जीवन जगू शकतो. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या गदारोळात बंधुभाव व सलोखा टिकून आहे. या चांगल्या भावनेतून व सामाजिक एकोप्यातून देशाची प्रगती होत असते, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant khaire) यांनी केले.

कतैया स्वामी जन्मोत्सवानिमित्त मालेगाव येथे बुरुड समाजाचा राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रत्येक समाजाने आपल्या जुन्या परंपरा व व्यवसाय कायम टिकून ठेवले आहे. यांत्रिकीकरणामुळे बारा बलुतेदार पध्दत कमी झाली आहे, हे खरं आहे. मात्र आजही अनेक पिढ्या नफा व फायदा न बघता आपला व्यवसाय कायम ठेवला आहे.

या गोष्टी पुढील पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. यावेळी दादाजी भुसे यांनी शेती हा व्यवसाय आजही पूर्णपणे पारंपरिक अवजारे व साहित्य वापरून केला जातो. यामध्ये आधुनिकीकरण व जुन्या पध्दतीने सांगड प्रगतीचा मार्ग दाखवते. त्यामुळे प्रत्येक समाजाचे पेंटंट कामी येत आहे. व्यासपीठावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, कृषिमंत्री दादाजी भुसे, महापौर सखाराम घोडके, –आदींसह नागरिक उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!